माळेगांव कारखान्यातील साखर कामगारांनी केला केंद्र सरकारचा निषेध
कायद्यांचा धिक्कार करून भाजपच्या मोदी सरकारचा निषेध
माळेगांव कारखान्यातील साखर कामगारांनी केला केंद्र सरकारचा निषेध
कायद्यांचा धिक्कार करून भाजपच्या मोदी सरकारचा निषेध
बारामती वार्तापत्र
माळेगांव कारखान्यातील साखर कामगारांनी आज दि.27.9.2021रोजी दुपारी 12 वाजता केंद्र सरकारने कामगार कायदे व शेतकरी कायदे बदलून…
कामगार व शेतकरी यांच्यावर अन्यायकारक कायदे लागू करण्याचा घाट घातलेला असल्यामुळे त्याच्याविरुद्ध आज देशातील कामगार संघटनांनी व शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त करणे साठी भारत बंदची हाक दिली होती.
त्याला अनुसरून महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने राज्यातील साखर कामगारांना भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यातील सर्व साखर कामगार संघटनांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आज दुपारी माळेगांव कारखाना गेटवर ” निषेध सभा”
झाली.निषेध सभे साठी माळेगांव कारखान्यातील बहुतांश साखर कामगार बांधवांनी गेटवर उपस्थित राहुन केंद्र सरकारने कामगार विरोधी केलेल्या कायदे व शेतकरी विरोधी केलेल्या कायद्यांचा धिक्कार करून भाजपच्या मोदी सरकारचा निषेध केला.
या वेळी कामगार नेते राजेंद्र तावरे, कामगार संचालक प्रमोद खलाटे , आर.टी.जगताप , विनोद तावरे, शेखर जगताप, सुरेश देवकाते, शेखर देवकाते, रविंद्र ढवाण,शरद चव्हाण, संजय देवकाते व इतर बहुसंख्य कामगार या निषेध सभेत सहभागी झाले होते या सभेत केंद्र सरकारचा निषेध करणेत आला.
राजेंद्र तावरे
अध्यक्ष
बारामती तालुका साखर कामगार सभा.
प्रमोद खलाटे – कामगार संचालक – माळेगांव कारखाना.