माळेगाव बु

माळेगावचे चेअरमन मीच होणार उपमुख्यमंत्री अजित पवार

जगताप,तावरे,सातव यांचा अपेक्षाभंग?

माळेगावचे चेअरमन मीच होणार उपमुख्यमंत्री अजित पवार

जगताप,तावरे,सातव यांचा अपेक्षाभंग?

बारामती वार्तापत्र 

बारामतीचा चेअरमन मीच असेल तर साखर आयुक्त काय करेल, सहकार मंत्री काय करेल? मी चेअरमन झालो तर योग्य पद्धतीने कामगारांचे प्रश्न मार्गी लावेल. डायरेक्टर चुकला तर मी आहे, मी काय करायचं ते करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला निवडून देण्याचं आवाहन कारखाना सभासदांना केलं आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १३ जूनला आपण चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यापूर्वीच केली होती. खरोखरच अजित पवार यांनी आपणच चेअरमन होणार असल्याचे सांगितले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील पुढले अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार असतील याची घोषणा स्वतः त्यांनीच केली.

अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात अत्यंत आक्रमकपणे केली होती. अजित पवारांनी एक वेगळेच भाषण केले. त्यांनी पहिल्या शब्दापासूनच अत्यंत आक्रमकपणे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर भाष्य केले. मी ‘ब’ वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून स्वतः अर्ज भरला असून मी स्वतःच कारखान्याचा पुढील अध्यक्षा असेल असे त्यांनी जाहीर केले आणि सभेचा नूर बदलला उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

https://youtu.be/aQZLoB6qvLI?si=xW1z5nVLalEyyCu7

अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार जर ते माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष झाले तर अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीतील ते सहकारी साखर कारखान्याचे पहिले अध्यक्ष असतील यापूर्वी त्यांनी जिल्हा बँक राज्य सहकारी बँक तसेच विविध संस्थांवर आणि संघटनावर अध्यक्ष पद भूषवले आहे आता अजित पवार स्वतः चेअरमन होणार असल्याने एक वेगळीच घटना या निमित्ताने राजकारणात पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Back to top button