माळेगावमध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीवर गोळीबार; रविराज तावरे यांच्यावर गोळीबार
एका अल्पवयीनाने हा गोळीबार केल्याचे सांगितले जात असून, या अल्पवयीनासह तीन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्वीच्या राजकीय भांडणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.

माळेगावमध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीवर गोळीबार; रविराज तावरे यांच्यावर गोळीबार
एका अल्पवयीनाने हा गोळीबार केल्याचे सांगितले जात असून, या अल्पवयीनासह तीन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्वीच्या राजकीय भांडणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
बारामती वार्तापत्र
बारामतीत जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या पतीवर गोळीबार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बारामतीतील जिल्हा परिषद सदस्यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाला आहे. माळेगाव येथे झाला गोळीबार झाला आहे. या घटनेनंतर रविराज तावरे यांना उपचारासाठी बारामती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका अज्ञात इसमाने तालुक्यातील माळेगाव येथे हा गोळीबार केला आहे. या प्रकारानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीतील तालुक्यातील माळेगावयेथे ऑडीमध्ये जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे हे संभाजीनगर या ठिकाणी वडापाव घेण्यासाठी थांबले असताना मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार केला, अशी माहिती समोर आली आहे. रविराज तावरे यांना जखमी अवस्थेत.
बारामतीतील बारामती हॉस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहे. तील संभाजीनगर भागात हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. अजून या विषयी पूर्ण माहिती नाही. तसेच पोलिसांकडूनही यासंदर्भात गुप्तता पाळली जात आहे त्यामुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहितीनुसार, तावरे हे पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासोबत माळेगावातील संभाजीनगर भागातून स्वत:च्या मोटारीतून गेले होते. तेथे वडापाव घेत त्यांनी वडापाव विक्रेत्याला पैसे दिले. गाडीकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रविराज यांच्या छातीत घुसली. जखमी अवस्थेत त्यांना लागलीच येथील बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.गोळीबारानंतर रविराज खाली कोसळले. त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तो पर्यंत हल्लेखोरांनी पळ काढला होता.
जखमी अवस्थेतील तावरे यांना दादा जराड, मयूर भापकर, युवराज जेधे, आदेश डोंबाळे यांनी तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर माळेगाव बुद्रूक येथे तणावपूर्ण वातावरण आहे. बारामती तालुका पोलिसांकडून गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी बारामती हॉस्पिटल येथे भेट घेत विचारपूस केली. यावेळी बारामती शहर चे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपस्थित होते