माळेगावातील अवैध धंदे बंद न झाल्यास, लहुजी शक्ती सेना आंदोलन करणार
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना दिले निवेदन
माळेगावातील अवैध धंदे बंद न झाल्यास, लहुजी शक्ती सेना आंदोलन करणार
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना दिले निवेदन
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव बु. येथे हातभट्टी दारू,जुगार , मटका अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे सामान्य नागरीकाला सर्वाधिक त्रास सोसावा लागत असून राजरोसपणे सुरू असलेले हे धंदे त्वरित बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
माळेगांव पोलिस दूरक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये हातभट्टीची दारू राजरोसपणे विक्री केली जात आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्याबरोबरच मटका, जुगार
या बेकायदेशीर धंद्याचे प्रमाण वाढलेमुळे गांवात अशांतता निर्माण झालीआहे.
बारामती तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी माळेगांव पोलीस दुरक्षेत्राचा नव्याने पदभार स्वीकारले सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्याकडे मागणी चे निवेदन दिले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास सकट, तालुकाध्यक्ष संजय नेटके, युवक अध्यक्ष सुरजकुमार खंडाळे, धनाजी यादव, ताई बापु पवार, शुभम मोहिते, सागर कुचेकर, आकाश पाटोळे, बाळासो साठे, फिरोज नाना पठाण, चेतन गायकवाड, राजेंद्र नेटके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विधाते म्हणाले, अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.