माळेगाव बु

माळेगावात भरदिवसा चोरी ; रोख रक्कमेसह नऊ लाखांचे दागिने लंपास

चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान

माळेगावात भरदिवसा चोरी ; रोख रक्कमेसह नऊ लाखांचे दागिने लंपास

चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान

माळेगाव– प्रतिनिधी

भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पावणे नऊ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना अमरसिंह कॉलनी माळेगाव येथे दि.२२ रोजी दुपारी दोन ते साडेआठ दरम्यान घडली.सदर घरफोटीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून भरदिवसा चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी विनोद दत्तात्रय चांडवले( वय-३० वर्षे रा.फ्लॅट नं.७ झगडे रेसिडेन्सी अमरसिंह कॉलनी माळेगाव ता.बारामती ) हे फ्लॅट बंद करून नातेवाईकांच्या कार्यक्रमाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रक्कम सात हजार रुपयेसह एक लाख रुपये चौसष्ट हजार पाचशे रुपयांचा साडेतिन तोळे सोन्याचा नेकलेस ,दोन लाख पस्तीस हजारांच्या पाच तोळ्यांचा सोन्याच्या बांगड्या, एक लाख एकेचाळीस हजारांची तिन तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ,चौ-यांनव्व हजारांचे दोन तोळ्यांचे सोने गंठण, सत्तेचाळीस हजारांची एक तोळ्यांची सोने चैन, अठ्ठावीस हजार दोनशे रुपयांच्या तीन ग्रॅम वजनाचे दोन अंगठ्या, अठ्ठावीस हजार दोनशे रुपयांच्या तिन ग्रॅम वजनाच्या दोन लहान चैन, सत्तेचाळीस हजारांची एक तोळे सोन्याची दानी, सत्तेचाळीस हजारांची एक तोळ्यांची सोन्याची पिळ्याची अंगठी,तिस हजारांचे चांदीचे ताम्हण, फुलपात्र,करंडा, गणपती पैंजण इ.अर्धा किलो चांदी, पंधरा हजारांचे चादींचे नाणे असा आठ लाख त्र्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

या चोरीचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.

दरम्यान सदर घरफोडीची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सुचना केल्या.तसेच पुणे येथुन फिंगरप्रिंट टिमला देखील पाचारण करण्यात आले आहे.सदर चोर सिसिटिव्हीत कैद झाले आहेत.

Related Articles

Back to top button