स्थानिक

“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण सुरू “

ऑनलाईन माध्यमाद्वारे अध्यापन व अध्ययनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम .

“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण सुरू “

ऑनलाईन माध्यमाद्वारे अध्यापन व अध्ययनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम .

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोनामुळे उद्भभवलेल्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे टीचींग-लर्निंग (अध्यापन- अध्ययन पध्दती) चा वापर व ट्रेनिंगचा ( प्रशिक्षण ) उपक्रम लॉकडाऊन सुरु झाल्यापासून करण्यात आलेला आहे.

लॉकडाऊननंतर येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमांच्याद्वारे विविध विषयांवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर , गुगल व्हर्च्युअल क्लास रुम, व्हर्च्युअल लॅब, झुम अपद्वारे इंडस्ट्रीतील नामांकित व तज्ज्ञ वक्त्यांचे विविध विषयावर जसे आर्टीफिशिअल इंटिलिजनस , मशीन लर्निंग ,डेटा सायन्स ,कम्युनिकेशन स्किल्स ,चॅलेंजेस आफ्टर लॉकडाऊन ,पायथॉन ,प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस इत्यादी अद्ययावत विषयावर सेमिनारचे आयोजन व मार्गदर्शन , टेस्ट सेरीज , असाइनमेंटस इत्यादींचा समावेश आहे.तसेच महाविद्यालयामार्फत विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी विविध विषयांवर आधारित फ्री-सर्टिफिकेशन कोर्सेसचेही आयोजन करण्यात येत आहेत.

महाविद्यालयातील प्राध्यापक वेळोवेळी झुम व युट्यूब या माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन व मार्गदर्शन करत आहेत.

तसेच भविष्यात येणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला सामोरे जाण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फेस कॅम्पस कॅप्सूल ऑनलाइन ट्रेनिंग ,फ्यूल व नॅसकॉम अंतर्गत विविध टेक्निकल कोर्सेसचे आयोजन , टीसीएस डिजिटल कोर्सेसचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम मुकणे यांनी दिली.

महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राऊळ व टीम, विविध विभाग प्रमुख, आणि सर्व विषय शिक्षक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून स्किल अपग्रेडेशन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत आणि या सर्व उपक्रमांचा पाठपुरावा देखील घेत आहेत.

लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लर्निंगद्वारे कौशल्य विकसित करून येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जावे व कोरोना विषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी प्राचार्य डॉ. एस.एम.मुकणे यांनी केले आहे.

वरील सर्व उपक्रम शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे मा. उपाध्यक्ष, सर्व मा. विश्वस्त व मा. सचिव यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!