माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या पुतण्याला धमकी! तावरे गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण
बारामती तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण
माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या पुतण्याला धमकी! तावरे गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण
बारामती तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण
बारामती वार्तापत्र
माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर 31 मे रोजी गोळीबार करण्यात आला होता.
याप्रकरणी मोरे टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोक्का लावला होता. त्यानुसार सर्व आरोपींना अटकही करण्यात आली होती दरम्यान रविराज तावरे यांच्या जबाबावरून पोलिसांनी माळेगाव येथील माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक केली होती .त्यावरून माळेगाव येथील नागरिकांनी या प्रकरणाचा निषेध करत गाव बंद आंदोलन केले होते.
मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजीत तावरे यांनाही रविराज तावरे यांच्या नातेवाईकांकडून धमकी देत असल्याचे त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टवरून दिसत आहे. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणाविषयी बारामती तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान या सर्व घटनेनंतर जयदीप तावरे यांचे वडील दिलीप तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन जे दोषी नसतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे सांगितले