माळेगाव कारखान्याच्या अपघाताची अजित पवार [उपमुख्यमंत्र्यांनी ] घेतली दखल .
माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये शनिवारी सकाळी घडलेल्या अपघाताची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. जखमी कामगारांची विचारपूस करण्यासाठी अजित पवार यांनी थेट हॉस्पिटल गाठले.
माळेगाव (ता. बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये शनिवारी सकाळी घडलेल्या अपघाताची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. जखमी कामगारांची विचारपूस करण्यासाठी अजित पवार यांनी थेट हॉस्पिटल गाठले.
कारखान्यात एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना मिथेन वायू तयार होऊन आठ कामगार गुदमरले होते. बारामतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमी कामगारांची विचारपूस करण्यासाठी अजित पवार यांनी थेट हॉस्पिटल गाठले.
या वेळी पवार यांच्यासमवेत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, अनिल तावरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव, सुरेश खलाटे, दत्तात्रेय भोसले आदी संचालक उपस्थित होते.
संबंधित पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे प्रमुख डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी चर्चा केली. या वेळी पवार यांनी वैद्यकीय उपचार योग्यरित्या होण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केली. माळेगावच्या जखमी कामगारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.