माळेगाव बु

माळेगाव कारखान्याच्या कामगार संचालकपदी चंद्रशेखर जगताप

१ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली

माळेगाव कारखान्याच्या कामगार संचालकपदी चंद्रशेखर जगताप

१ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली

बारामती वार्तापत्र 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी श्री. चंद्रशेखर उत्तमराव जगताप यांची निवड करण्यात आली. तत्कालीन चेअरमन तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कामगार संचालक नियुक्त करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता.

त्या ठरावाची अंमलबजावणी सोमवार, दि. १ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली.
निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात कारखान्याच्या व्हाइस चेअरमन सौ. संगीता कोकरे आणि माजी चेअरमन तथा ज्येष्ठ संचालक बाळासाहेब (भाऊ) तावरे यांच्या हस्ते श्री. जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, संचालक मंडळाचे सदस्य, बारामती तालुका साखर कामगार सभेचे अध्यक्ष विनोद तावरे, उपाध्यक्ष सुरेश देवकाते, खजिनदार शहाजी गोफणे, संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कामगार तसेच पणदरे पंचक्रोशीतील युवक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश देवकाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक मंडळाच्या वतीने संचालक नितीन शेंडे व योगेश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कामगार संघटनेचे राजेंद्र तावरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

समारोप प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विनोद तावरे यांनी कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार, व्हाइस चेअरमन सौ. संगीता कोकरे, संचालक मंडळ, अधिकारी, कामगार आणि सभासदांचे आभार मानले. कामगार प्रतिनिधीला संचालक मंडळावर संधी मिळाल्याने कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Back to top button