स्थानिक

माळेगाव कारखान्याच्या चेअरमनसाठी 5 कोटीचा लिलाव – चंद्रराव तावरे?

सुज्ञ सभासदांनी वेळीच जागे होऊन, भूलथापांना बळी पडू नका

माळेगाव कारखान्याच्या चेअरमनसाठी 5 कोटीचा लिलाव – चंद्रराव तावरे?

सुज्ञ सभासदांनी वेळीच जागे होऊन, भूलथापांना बळी पडू नका

निरावागज;प्रतिनिधि

दि माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत चेअरमन पदासाठी 5 कोटी रूपयांचा लिलाव झाल्याचा उलघडा आज प्रचाराचा नारळ वाढविताना ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी सांगितले.

आज निरावागज याठिकाणी ‌‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल‌’ चा प्रचाराचा नारळ वाढविताना विरोधकांवर आरोप करीत असताना श्री.तावरे यांनी सडकून टिका केली.

ते पुढे म्हणाले, माझ्याकडे कोण, कोण आले होते. कोणी कितीचा संचालक व चेअरमन पदाचा भाव काढला हे मला सांगायला लावू नका. आज ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादन केलेल्या ऊसाला भाव देण्याचे राहिले दूर यांचे चेअरमनपदासाठी भाव फुटला असल्याचेही तावरे यांनी सांगितले.

आज आपण सर्व सुज्ञ सभासदांसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनेल असे नाव देऊन कारखान्याच्या निवडणूकीत उतरलो असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांना सहकाराचा एवढा पुळका आला कसा, कारण यांना यांची खाजगी कारखाने टिकवायचे आहे आणि जास्तीत जास्त ऊस गाळप करायचा आहे.

उद्याला माळेगावने आणखीन भाव दिला तर यांचे कारखाने ओस पडतील असेही ते म्हणाले. त्यामुळेच या निवडणूकीत जातीने लक्ष घातल्याने दिसत आहे.

सुज्ञ सभासदांनी वेळीच जागे होऊन, भूलथापांना बळी पडू नका आणि तुमच्या प्रपंचाचा विचार करून सर्व सभासदांच्या हितासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनेल केला आहे असे तावरे यांनी उपस्थितांना सांगितले.

तत्पुर्वी रंजन तावरे म्हणाले, `माळेगावची शिक्षण संस्था पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला जोडायची आहे. माळेगाव ऐवढा ऊस बाजार इतर खाजगी कारखान्यांना द्यावा लागतो, हे थांबविण्यासाठी अजित पवार माळेगावच्या संचालक मंडळात येण्यासाठी उत्सूक आहेत. त्यांना थांबविण्यासाठी येणाऱ्या निवडणूकीत सभासदांनी निर्णायक भूमिका घेतली पाहिजे.

त्यामध्ये महिलांनीही या निवडणूकीत प्रपंच डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे,` असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार राजेश देवकाते, विठ्ठल देवकाते, रोहन कोकरे, धनुभाऊ गवारे, रोहित जगताप, उत्तम तावरे आदींनी मनोगते व्यक्त केली.

Related Articles

Back to top button