” माळेगाव कॉमर्स कॉलेजमध्ये डिजिटेक महोत्सव उत्साहात साजरा”
स्पर्धेसाठी परिसरातील विविध महाविद्यालयातील 218 मुलांनी आपला सहभाग नोंदविला.

” माळेगाव कॉमर्स कॉलेजमध्ये डिजिटेक महोत्सव उत्साहात साजरा”
स्पर्धेसाठी परिसरातील विविध महाविद्यालयातील 218 मुलांनी आपला सहभाग नोंदविला.
बारामती वार्तापत्र
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे, कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन, महाविद्यालयातील बीएससी कॉम्प्युटर सायन्स या विभागामार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी “डिजिटेक महोत्सव 25” या कॉम्प्युटर क्षेत्रातील विविध स्पर्धेचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवामध्ये सी- कोडिंग ,ब्लाइंड – कोडींग आणि पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी परिसरातील विविध महाविद्यालयातील 218 मुलांनी आपला सहभाग नोंदविला.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अजित चांदगुडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमधील विजेते
प्रथम क्रमांक: प्रतीक्षा माने आणि शीतल यादव,द्वितीय क्रमांक : प्रतीक्षा वाबळे आणि देवयानी सपाटे,तृतीय क्रमांक:निकिता मुळे आणि वैष्णवी तावरे
ब्लाइंड कोडींग स्पर्धेचे विजेते
प्रथम क्रमांकाचे विजेते: पायल चौधरी, ,द्वितीय क्रमांकाचे विजेते: उज्वल भालगत ,तृतीय क्रमांकाचे विजेते : वेदांत ननवरे
सी कोडींग स्पर्धेचे विजेते:
प्रथम क्रमांक:रोहन देचौधरी, द्वितीय क्रमांक: अंकुर मिश्रा, तृतीय क्रमांक :पायल शितोळे,उत्तेजनार्थ रोहन मेरगळ
या स्पर्धेसाठी परीक्षण करण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कॉलेज मधील प्रा.गौतम कुदळे व प्रा. किशोर ढाणे उपस्थित होते तसेच एस.व्ही पी.एम. मधील प्रा. खलाटे सर,प्रा. ननवरे सर ,प्रा. दाभाडे मॅडम, प्रा नितीन तावरे सर आणि प्रा सीमा पोंदकुले यांनी हे काम पाहिले.
प्रा. संतोषी पवार यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे एच.ओ.डी प्रा. सचिन सस्ते आणि सर्व प्राध्यापक तसेच इतर डिपार्टमेंटचे प्रा. निलेश चव्हाण, प्रा योगेश तावरे तावरे , प्रा.सोनाली बंडगर व प्रा. पुनम केवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“डिजिटेक महोत्सव” या प्रोग्रामचे आयोजन यशस्वी होण्याकरता संस्थेचे उपाध्यक्ष, संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.