माळेगाव च्या अध्यक्षपदी तावरे सोडून इतरांना संधी देणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार……
दिलेला शब्द अजितदादा पाळणार का?
माळेगाव च्या अध्यक्षपदी तावरे सोडून इतरांना संधी देणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार……
दिलेला शब्द अजितदादा पाळणार का?
बारामती वार्तापत्र
माळेगावच्या अध्यक्षपदी निवड करताना कोणाचीही सत्ता असली तरी अध्यक्ष मात्र तावरे असतात. विरोधात सत्ता होती, तर चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे अध्यक्ष होते, तर राष्ट्रवादीची सत्ता असताना आता आणि यापूर्वी बाळासाहेब तावरे हे अध्यक्ष झाले. आता यापुढील अध्यक्ष हा तावरे आडनाव सोडून असेल हा माझा शब्द आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघळवाडी येथील मेळाव्यात बोलताना सांगितले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज वाघळवाडी येथील सोमेश्वर पॅलेस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. माळेगावच्या कार्यक्षेत्रात झाली चर्चा सुरू
अजित पवार यांच्या सोमेश्वर कारखान्याच्या मेळाव्यानंतर माळेगावात लगेच माळेगाव कारखान्याचा नवीन अध्यक्ष कोण? याची चर्चा सुरू झाली. सहाजिकच अजित पवार यांच्या एका शब्दाने माळेगाव कार्यक्षेत्रात अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या.