माळेगाव बु

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची सरशी

प्रभागनिहाय पाहता अपक्ष उमेदवारांची स्थिती भक्कम आहे.

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची सरशी

प्रभागनिहाय पाहता अपक्ष उमेदवारांची स्थिती भक्कम आहे.

बारामती वार्तापत्र

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, सध्याच्या कलानुसार अपक्ष उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांना मतदारांनी अधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे.

या निवडणुकीत माळेगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रंजन तावरे यांच्या गटाने युती करून निवडणूक लढवली होती. मात्र या युतीला शरद पवार गटासह अनेक अपक्ष उमेदवारांनी तगडे आव्हान दिले.

स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि थेट जनसंपर्क याच्या जोरावर अपक्ष उमेदवारांनी मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे दिसून येत आहे.

प्रभागनिहाय पाहता अपक्ष उमेदवारांची स्थिती भक्कम आहे.

प्रभाग क्रमांक 1 मधून दिपाली अनिकेत बोबडे या अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये महिला अपक्ष उमेदवार रेश्मा सय्यद यांनी आघाडी घेतली आहे.
प्रभाग क्रमांक 6 मधून वैभव खंडाळे हे अपक्ष उमेदवार मतमोजणीत पुढे आहेत.
तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये पप्पू खरात या अपक्ष उमेदवाराने आघाडी मिळवली आहे.
या निकालांवरून माळेगाव नगरपंचायतीत स्थानिक नेतृत्वावर मतदारांनी अधिक विश्वास दाखवल्याचे स्पष्ट होते.

राजकीय पक्षांच्या युती असूनही अपक्ष उमेदवारांची वाढती ताकद ही आगामी स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे. अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष असून, अपक्षांचे वर्चस्व कायम राहते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Back to top button