राजकीय

माळेगाव नगरपंचायतीत प्रभाग क्र. 1 मधून अपक्ष उमेदवार म्हणून दीपाली अनिकेत बोबडे चर्चेत

“जनतेच्या हक्कासाठी लढा देण्यास मागे हटणार नाही”

माळेगाव नगरपंचायतीत प्रभाग क्र. 1 मधून अपक्ष उमेदवार म्हणून दीपाली अनिकेत बोबडे चर्चेत

“जनतेच्या हक्कासाठी लढा देण्यास मागे हटणार नाही”

बारामती वार्तापत्र 

माळेगाव येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष उमेदवार म्हणून सौ. दीपाली अनिकेत बोबडे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर माळेगावमध्ये त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. माळेगावच्या राजकारणातील दीर्घकालीन गटातट, एकमेकांविरोधातील राजकीय समीकरणे आणि अंतर्गत संघर्षांना कंटाळलेल्या मतदारांमध्ये स्वतंत्र व सक्षम नेतृत्वाची मागणी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दीपाली बोबडे यांची उमेदवारी महत्त्वाची ठरत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

दीपाली बोबडे या एका नामांकित बँकेत नोकरी केली असून, सामाजिक बांधिलकी जोपासण्याची इच्छा आणि लोकसेवेची ओढ यामुळे त्यांनी थेट राजकारणात उडी घेतली आहे. त्यांच्या उमेदवारीमागे त्यांच्या पतींचा अनिकेत बोबडे यांची मजबूत सामाजिक प्रभाव आणि जनाधारही महत्त्वाचा आहे. अनिकेत बोबडे यांनी गेल्या काही वर्षांत गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होत, पक्षीय राजकारणापेक्षा लोककारणाला प्राधान्य देत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे.

स्वतःकडे प्रचंड जनाधार असूनही पक्षाने तिकीट नाकारले तरीही “जनतेच्या हक्कासाठी लढा देण्यास मागे हटणार नाही” अशी त्यांची भूमिका कायम राहिली. याच धर्तीवर त्यांनी आपल्या पत्नीला—दीपाली बोबडे यांना—अपक्ष उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

दीपाली बोबडे म्हणाल्या की, “सामाजिक बांधिलकी हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू आहे. पक्ष मिळो अथवा न मिळो, आम्ही जनतेच्या जोरावर उभे आहोत. माळेगावातील गटातटाच्या राजकारणाला नवा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

स्थानिक नागरिकांचाही असा विश्वास आहे की, माळेगावातील पारंपरिक गटबाजीला छेद देत नवीन दिशा देण्याची क्षमता बोबडे दांपत्यात आहे. “माळेगावात लढा म्हणजे नेहमीच वेगळा असतो, आणि हा लढा बोबडे दाम्पत्य समर्थपणे लढू शकते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

माळेगाव नगरपंचायतीत पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक रंगत जाणार असून, प्रभाग क्रमांक 1 मध्ये दीपाली बोबडे यांच्या अपक्ष उमेदवारीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button