माळेगाव बु

माळेगाव नगरपंचायत निवडणूक आराखडा गुगल मॅपद्वारे होणार :- प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील म्हणाले

माळेगावची लोकसंख्या सन २०११ जनगणनेनुसार २५ हजारांच्या आत आहे.

माळेगाव नगरपंचायत निवडणूक आराखडा गुगल मॅपद्वारे होणार :- प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील म्हणाले

माळेगावची लोकसंख्या सन २०११ जनगणनेनुसार २५ हजारांच्या आत आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी संभाव्य प्रभाग आराखडा तयार करण्याचे काम अद्याप चालु केले नसून प्रभाग रचना गुगल मॅपद्वारे करण्यात येईल अशी माहिती प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.

तालुक्यातील पहिली नगरपंचायत स्थापनेचा मान माळेगावला मिळाला आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून डिसेंबर अखेर मुदत संपणा-या महानगर पालिका,नगरपालिका,नगरपंचायत यांच्या निवडणूक होणार असून यासाठी कच्चा आरखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.या निवडणुका एक प्रभाग पध्दतीने होणार आहेत. माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक देखील याच टप्प्यात होणार आहे.यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कामकाज होणार आहे. गेली नऊ महिने झाले माळेगावचा कारभार प्रशासक पहात आहेत. नगरपंचायत पंचायत निवडणूक लवकर व्हावीत अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

याबाबत प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील म्हणाले की,शासकीय नियमानुसार ज्या नगरपंचायतीची लोकसंख्या पंचवीस हजारांच्या आत आहे.त्या नगरपंचायतीमधे १७ सदस्य असतात व ज्या नगरपंचायतीची लोकसंख्या २५ हजारापेक्षा जादा आहे. तिथे तिन हजार लोकसंखेमागे एक सदस्य अशी रचना आहे. या निवडणूकीसाठी माळेगावची लोकसंख्या सन २०११ जनगणनेनुसार २५ हजारांच्या आत आहे.या निवडणुकीसाठी भौगोलिक परिस्थितीचा विचार करून गुगल मॅपद्वारे होणार असून तो प्रभाग पारदर्शीपणे होणार आहे.माळेगावच्या प्रभाग आराखड्यास अद्याप ही सुरुवात झाली नाही असे स्पष्टपणे सांगितले.

*चौकट :-

सध्या कच्च्या आराखड्या बाबत अनेक अफवा पसरलेल्या आहेत. भावी इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष अशी दिवास्वप्ने पहाणारे आराखड्या बाबत अफवा पसरवून ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. आराखड्याचे कामच सुरु नसल्याने प्रभाग कुणी अन कसे तयार केले याची चर्चा होत असून अफवांवर विश्वास ठेवु नये.

Related Articles

Back to top button