माळेगाव येथील रस्त्याचे सौ.रोहिणी तावरे यांच्या हस्ते भूमिपूजन.
जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी रविराज तावरे(लाखे)यांच्या माध्यमातून मंजूर.
माळेगाव बुद्रुक येथील बागेतली आई तुळजाभवानी देवस्थान (क वर्ग तीर्थक्षेत्र) नीरा बारामती रस्ता ते देवस्थान रस्ता या मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी रविराज तावरे(लाखे)यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या दहा लक्ष रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी रविराज तावरे(लाखे) यांच्या शुभहस्ते तसेच माळेगावचे सरपंच जयदीप तावरे, माजी सरपंच दीपक बापू तावरे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वसंतराव बाबुराव तावरे, उपसरपंच लियाकत तांबोळी,धनवान काका वदक, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमित अण्णा तावरे,रविराज तावरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश पाटील गोफने, नितीन वसंतराव तावरे,नितीन दीलीपराव तावरे, राहुल दिलीप राव तावरे, अशोक सस्ते,सचिन तावरे(लाखे),तसेच देवस्थानचे विश्वस्त मंडळ पटेल शेठ,करतार पाटील तावरे, बाबाराजे पैठणकर,यादव मामा,सस्ते मामा, तावरे मामा,गायकवाड मामा,शिवेंद्रा तावरे, चंद्रकांत भुंजे शिवाजीराव तावरे,बंडोपंत चावरे ,धनंजय शहा, तरडेमामा,सुरज तावरेयांच्या उपस्थितीत पार पाडला.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यापूर्वीच पाच लाख रुपयाचे सुशोभिकरण मंदिराच्या परिसरात करण्यात आलेले आहे .येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी बागेतल्या आई तुळजा भवानी देवस्थान मंडळाला देण्यात येईल असे जिल्हा परिषद सदस्या रोहिनीताई तावरे यांनी यावेळी सांगितले.