माळेगाव बु

माळेगाव सहकारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बन्सीलाल आटोळे

तानाजीराव कोकरे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

माळेगाव सहकारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बन्सीलाल आटोळे

तानाजीराव कोकरे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येऊ लागली तस-तशी महाराष्ट्रातील राजकारणात रंगत येऊ लागली आहे याचेच एक उदाहरण म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बन्सीलाल आटोळे यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप तसेच सर्व संचालक उपस्थित होते या पदासाठी अनेक मान्यवरांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु या जागेचा मान आटोळे यांनी पटकावला असून येणाऱ्या काळातही नगरपालिका बँकांच्या निवडणुका येणार असून बारामती मध्ये राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसून येत आहे

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून बन्सीलाल आटोळे यांची पुढील एक वर्षासाठी निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप,कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप तसेच सर्व संचालक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button