माळेगाव बु

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर

'ब' वर्गातून अजित पवार उमेदवार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर

‘ब’ वर्गातून अजित पवार उमेदवार

बारामती वार्तापत्र 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.

यावेळी विद्यमान चेअरमन केशवराव जगताप, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर उपस्थित होते.

मागील संचालक मंडळातील सात संचालकांना पुन्हा संधी देण्यात आले आहे. नीलकंठेश्वर पॅनल मध्ये जुन्या नव्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार स्वतः ब वर्गातून उमेदवार राहिले आहेत.

निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे

माळेगाव गट नंबर एक
बाळासाहेब पाटील तावरे
रणजीत उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव
राजेंद्र सखाराम वुरुंगले

पणदरे गट नंबर दोन
तानाजी तात्यासो कोकरे
स्वप्नील शिवाजीराव जगताप
योगेश धनसिंग जगताप

सांगवी गट नंबर तीन
विजय श्रीरंगराव तावरे
विरेंद्र अरविंद तावरे
गणपत चंदरराव खलाटे

खांडज-शिरवली गट नंबर चार
प्रताप जयसिंग आटोळे
सतीश जयसिंग फाळके

निरावागज गट नंबर पाच
जयपाल निवृत्ती देवकाते
अविनाश गुलाबराव देवकाते

बारामती गट नंबर सहा
नितीन सदाशिव सातव
देविदास सोमनाथ गावडे

ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था
अजित अनंतराव पवार

अनूसूचित जाती/जमाती
रतन कुमार साहेबराव भोसले

महिला राखीव प्रतिनिध
संगीता बाळासाहेब कोकरे
ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले

इतर मागास प्रवर्ग
नितीन वामनराव शेंडे

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
विलास ऋषिकांत देवकाते.

४१ वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. माळेगाव कारखान्यासाठी ब वर्गातून अजित पवारांची उमेदवारी भरली आहे. अजित पवार यांनी १९८४ ला इंदापूरच्या छत्रपती कारखान्यापासून अजित पवारांच्या कारकिर्दी सुरुवात झाली.

आता १९८४ नंतर पुन्हा ४१ वर्षांनी अजित पवार हे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरत आहेत.

बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. यासाठी नामनिर्देश भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द ब वर्ग प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Related Articles

Back to top button