माळेगाव बु

माळेगाव साखर कारखाना निवडणूकत:अखेर ठरला तावरे गुरू-शिष्यच्या सहकार बचाव पॅनल यादी जाहीर

माळेगावच्या निवडणूकीत चौरंगी लढत होणार

माळेगाव साखर कारखाना निवडणूकत:अखेर ठरला तावरे गुरू-शिष्यच्या सहकार बचाव पॅनल यादी जाहीर

माळेगावच्या निवडणूकीत चौरंगी लढत होणार

बारामती वार्तापत्र

दि माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत चेअरमन पदासाठी 5 कोटी देतो,10 कोटी देतो असा लिलाव सुरू असल्याचे आज प्रचाराचा नारळ वाढविताना ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी सांगितले.
आज निरावागज याठिकाणी ‌‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल‌’ चा प्रचाराचा नारळ वाढविताना विरोधकांवर आरोप करीत असताना श्री.तावरे यांनी सडकून टिका केली.
ते पुढे म्हणाले, मागील चेअरमन होण्यासाठी अडीच कोटीचा भाव निघाला होता ते पैसे म्हणे पक्षाला मिळाले खरे की खोटे हे सांगता येणार नाही. कारखान्याचा बाजार करून ठेवला आहे. समजुत घालण्यासाठी एक दिवशी अर्धी रात्र झोप नाही, राजवर्धन शिंदे आले, विक्रम भोसले आले, किरण गुजर दोन वेळा आले. नितीन सातव पाच ते सात वेळा आले, छत्रपतीचे चेअरमन दोन ते तीन वेळा आले या सर्वांचे ऐकले मात्र शेवटी निर्णय घेतला आम्हाला कारखाना वाचवायचा आहे.
नेत्यांना छत्रपतीला काय केले ते इथं करायचे आहे. 50 कोट छत्रपतीला दिले असते तर तो कारखाना जगला असता महाराष्ट्र बँक, जिल्हा बँक यांच्या ताब्यात होती तरीही दिले नाही. प्रपंच मोडत असेल, तर ऐकून घ्यायचे का? आज माळेगाव कार्यक्षेत्रातून कारखाना काढला तर आपल्या जीवनात काय राहते ते बघा. आज छत्रपतीची काय अवस्था केली. अंबालीका मोडलेला कारखाना जोमात चालतो दोघांचा मालक एकच असेही ते म्हणाले. नेत्यांची दमदाटी सुरू झाली, माझी उणं धुणं काढले तर माझ्याशी गाठ आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे, कारखान्याचे आकडेवारी कळत नसतील तर अवघड आहे असेही ते म्हणाले.
खासदारकी व आमदारकीला आमचे वय दिसत नाही, कारखान्याच्या निवडणूकीला बरं वय दिसते असेही ते म्हणाले.

निवडणूकीच्या काळात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना लक्ष्मीचे दर्शन होईल, लक्ष्मी घेऊन येतील ती लक्ष्मी टाळू नका घ्या कुठे त्यांच्या कष्टाचा पैसा आहे. पण मतदान करताना सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या किटली या चिन्हापुढे आपला अमूल्य मत देऊन निवडून द्या आणि नंतर खिसा फाटेपर्यंत पैसे घेऊन जा असेही ते शेवटी म्हणाले,
446 रूपयांचे कर्ज करून ठेवले आहे. 76 लाखाच्या बेअरींग शिल्लक असताना 111 कोटी रूपयांच्या बेअरींग घेतल्या. पाच वर्षात या संचालक मंडळाने फक्त एक गोडाऊन बांधले तेही गळाले यामुळे 60 हजार साखरेची पोती भिजली. 1900 रूपये भावाने साखरचे पोते हिशोब काढल्यास कुठे जाते. गोडाऊन बांधताना अंदाजपत्रकाच्या पुढे म्हणजे 82 लाख 19 हजार 656 रूपये जास्तीचा खर्च केला. असा सगळा सावळा गोंधळ या संचालक मंडळाने केला आहे. नेत्याच्या मागे-पुढे पळणारी घरी येऊन सांगतो काय सांगू तुला, दादा माझ्याकडून बघून हसले ही एवढ्याच कामाची आहे. तरी सुज्ञ सभासदांनी अशा भुलथापांना बळी न पडता आपला प्रपंच सुरळीत चालण्यासाठी, आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनेलला मतदान करा अशीही भावनिक साद चंद्रराव तावरे यांनी यावेळी दिली.
यावेळी रंजनकाका तावरे यांनी सुद्धा परखड असे मत मांडले तसेच विविध आजी माजी संचालकांनी यावेळी मत व्यक्त केले व संचालक मंडळाने केलेल्या कारभाराचे वाभाडे बाहेर काढले.

Related Articles

Back to top button