मास्क घाला अन्यथा कारवाई होणार
पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाईची मोहीम तीव्र
बारामती वार्तापत्र
देशात आणि राज्यात कोरोना महामारीने आपले उग्र रूप धारण केलेले असताना राज्यात तसेच वेगवेगळ्या भागात लॉकडाऊन करण्यात आले होते हा कालावधी संपला आणि नागरिकांची रस्त्यावर यायची जनु स्पर्धा सुरू झाली काही बेजबाबदार नागरिक ,बेफिकीर वृत्तीने मास्क न वापरता सामाजिक अंतर न ठेवता घरातून बाहेर पडत आहेत त्यामुळे कोरोना वाढीस हातभार मिळत आहे त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुन्हा कारवाईसाठी मोहीम तीव्र केली आहे.
आज जिल्ह्यात 406 नागरीकांवर कारवाई
वीणा मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत पुणे ग्रामीण पोलीस दलाने मास्क न घालणारे, सामाजिक अंतर न पाळणारे तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1 ) (3 ) चे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली आहे यामध्ये 406 बेफिकीर व बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करून सुमारे 54 हजार 800 रुपयांचे दंडाची रक्कम वसूल केली
पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की नागरिकांनी विना मास्क बाहेर फिरू नये, सामाजिक अंतर पाळावे, पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन गर्दी करु नये, सार्वजनिक आस्थापनांवर गर्दी करू नये, बेकायदा जमाव जमवू नये असे आदेश दिले आहेत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढील काळात सर्व कायदेशीर बाबींची पालन करावे