मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरासाठी छोट्या चिमुकल्या कु.स्वराचा एक हात मदतीच
आमदार निलेश लंके साहेब यांना भेटण्याची इच्छा एका व्हिडिओ व्दारे व्यक्त केली होती.
मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरासाठी छोट्या चिमुकल्या कु.स्वराचा एक हात मदतीच
आमदार निलेश लंके साहेब यांना भेटण्याची इच्छा एका व्हिडिओ व्दारे व्यक्त केली होती.
फलटण( प्रतिनिधी); बारामती वार्तापत्र
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील
कु.स्वरा योगेश भागवत (वय वर्षे-६) सुप्रसिद्ध अँथलीट मु.पो गोखळी ता फलटण हिच्या कडून स्वतःच्या बचतीचे पैसे पिगी बँक ( गल्ला) मा.आमदार लोकनेते निलेश लंके यांचेकडे मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरातील रुग्ण सेवेसाठी सुपुर्द केला.
पारनेर तालुक्याचे बहुचर्चित आमदार निलेश लंके नुकतेच फलटण तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना कु.स्वरा भागवत ने आमदार निलेश लंके साहेब यांना भेटण्याची इच्छा एका व्हिडिओ व्दारे व्यक्त केली होती.सदर व्हिडिओ पाहिल्यानंतर आ. लंके यांनी आपल्या फलटण दौ-यावर कु.स्वरा भागवत हिची आवर्जून भेट घेतली यावेळी कु.स्वराने स्वतः च्या बचतीचे पैसे आ. लंके चालवत असलेल्या मा. शरदचंद्रजी पवार साहेब १२०० बेड असलेल्या कोविड सेंटर चे कार्य सोशल मीडिया च्या माध्यमातून पाहुण फूल ना फुलाची पाकळी मदत द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आमदार निलेश लंके साहेब यांच्याशी प्रत्यक्ष भेटून स्वतः च्या बचतीचे पैसे निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर या आरोग्य मंदिरा आ.निलेश लंके यांचे सुपूर्त केलें यावेळी पारनेर चे गटविकास अधिकारी किशोर माने,आयुर उद्योगाचे प्रमुख दिगंबर आगवणे,गोळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन शिवाजी लगुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कु.स्वरा भागवत चे मनापासून आभार मानण्यात आले.