इंदापूर

घोटाळे किरीट सोमय्या बाहेर काढतात, मुख्यमंत्री राज्यपालांवरती खुन्नस काढतात-किरीट सोमय्या

इंदापूर येथील पत्रकारपरिषदेत किरीट सोमय्या यांची जहरी टीका

घोटाळे किरीट सोमय्या बाहेर काढतात, मुख्यमंत्री राज्यपालांवरती खुन्नस काढतात-किरीट सोमय्या

इंदापूर येथील पत्रकारपरिषदेत किरीट सोमय्या यांची जहरी टीका

इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारपरिषदेत बोलताना वरील मत व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यागिरी यांना दि.११ रोजी विमान देण्यावरून घडलेल्या घडामोडीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की,उद्धव ठाकरे व त्यांच्या सहयोगींचे घोटाळे किरीट सोमय्या बाहेर काढतात कारवाई ईडी करते व मुख्यमंत्री ठाकरे राज्यपालांवरती खुन्नस काढतात.एक आठवड्यापूर्वी राज्यभवन यांनी कळविले होते.उद्धव ठाकरे यांनी ठरवून त्याची अनुमती दिली नाही आणि नाकारले हे कळवले पण नाही असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की,आता माझं एकच टार्गेट आहे की सहा महिन्यांच्या आत शिवसेनेचे एक डझन नेते गैर कारभाराच्या तार्किक निष्कर्षापर्यंत पोहचतील असे म्हणत त्यांनी विविध विषयांवरती भाष्य केले.

Back to top button