‘मिशन बिगीन अगेन’ नुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत उद्या पासून चालू राहणार
प्रतिबंधित क्षेत्र वगळून आस्थापनांना सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत
‘मिशन बिगीन अगेन’ नुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत राहणार चालू
प्रतिबंधित क्षेत्र वगळून आस्थापनांना सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत
बारामती वार्तापत्र
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी कोरोनाविषाणू मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे अनुषंगाने टप्पे निहाय लॉक डाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करणेबाबत परिपत्रक काढले असून मिशन बिगीन अगेन नुसार जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित ठिकाणच्या आस्थापनांना सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आलेले आहे. त्यानुसार उद्या पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
तसेच कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपात्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊन ची घोषणा यापूर्वी केलेले असून त्यास 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे व अधिसूचनेतील परिशिष्ट १, २ व ३ मध्ये नमूद केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणेकामी शासन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे