इंदापूर

मिसेस इंडिया युनिव्हर्स च्या स्पर्धेमध्ये सौ.किमया बोरा यांना भेटला टॅलेंटेड क्वारंटाईन क्वीन 2020 हा किताब.

इंदापूरच्या नावलौकिकात भर.

मिसेस इंडिया युनिव्हर्स च्या स्पर्धेमध्ये सौ.किमया बोरा यांना भेटला टॅलेंटेड क्वारंटाईन क्वीन 2020 हा किताब.

इंदापूरच्या नावलौकिकात भर.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

दि.10 ते 19 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स टॅलेंटेड क्वारंटाईन क्वीन 2020 या स्पर्धेत कलागुण,कुशलता व बुद्धिमतेच्या जोरावर इंदापूरच्या सौ.किमया पियुष बोरा यांनी हा किताब पटकावून जागतिक स्तरावर भरारी घेऊन इंदापूरच्या नावलौकिकात भर टाकली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा जागतिक स्तरावर ऑनलाइन भरवण्यात आली होती.भारतीय नागरिकत्व असलेल्या पण वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या एकूण ऐंशी महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत इंदापूर च्या रहिवासी असणाऱ्या किमया पियुष बोरा यांनी मिसेस इंडिया युनिव्हर्स टॅलेंटेड क्वारंटाईन क्वीन 2020 हा किताब आपल्या कला कौशल्याच्या जोरावर पटकावला असून या जागतिक स्तरावरील स्पर्धेत बोरा यांनी, नृत्य, नृत्य प्रशिक्षिका, स्वरचित कविता, सूत्रसंचालन, रॅम्प वॉक, फोटोग्राफी, कुकिंग व नाविन्यपूर्ण कलाकृती या सर्व कलागुणांमध्ये सहभाग घेत, सर्व कलागुणांमध्ये महिला परिपूर्ण असल्याचे त्यांनी सिद्ध केले. किमया बोरा गृहिणी असून, स्पर्धेत “महिला सशक्तीकरण” हा विषय मांडत त्यांनी ‘मिसेस युनिव्हर्स’ च्या मंचावरील सर्व प्रेक्षक व परिक्षकांची मने जिंकली.

या स्पर्धेसाठी त्यांचे पती युवा उद्योजक पियुष बोरा यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. किमया पियुष बोरा यांनी हा किताब पटकावल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूरच्या प्रथम नागरिक अंकिता शहा,भारतीय जैन संघटना इंदापूर चे अध्यक्ष धरमचंद लोढा, मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधा गारटकर, जैन सोशल ग्रुपचे नरेंद्र गांधी, युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शिताप,नगरसेविका हेमलता माळुंजकर, शहा हर्बल वर्ल्ड च्या अध्यक्षा डॉ. राधिका शहा तसेच सामजिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button