राजकीय

”मी सुनेत्रा अजित पवार…” बघा शपथविधीत काय घडलं, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मिळाला मान

मागील २४ तासांमध्ये काय घडलं?

”मी सुनेत्रा अजित पवार…” बघा शपथविधीत काय घडलं, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मिळाला मान

मागील २४ तासांमध्ये काय घडलं?

बारामती वार्तापत्र 

दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे. शनिवारी संध्याकाळी लोकभवन येथे पार पडला आहे.

शपथविधीला येताना समर्थकांनी फुले आणि पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. हा शपथविधीचा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.

मागील २४ तासांमध्ये काय घडलं?

मागील २४ तासांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. शुक्रवारी सकाळी अजित पवार यांच्या अस्थी विसर्जित केल्या आणि त्यानंतर सर्व नेते एकत्र जमले होते. सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावं असा प्रस्ताव मांडला आणि तो फडणवीस यांनी मान्य केला.

शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांकडे पोहचले. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे पत्र मिळाले. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता शपथविधी पार पडला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार हे अनुपस्थित होते. अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा या खंबीर आहेत.

Back to top button