स्थानिक

मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलकांसाठी बारामतीतून जेवणाची व्यवस्था कशी केली जातेय..

मोठ्या प्रमाणात मदत

मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलकांसाठी बारामतीतून जेवणाची व्यवस्था कशी केली जातेय..

मोठ्या प्रमाणात मदत

बारामती वार्तापत्र

मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी बारामतीतून 5000 हजार भाकरी,1000 हजार बिसलेरी बॉक्स आणि बिस्कीट पुडे इतर साहित्य रवाना…

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असेपर्यंत बारामतीतून उपयोगी साहित्य पाठविण्यात येणार: मराठा बांधवांनी केला विश्वास व्यक्त

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण सुरू केलंय मुंबईतील उपोषणस्थळी राज्यभरातून लाखो मराठा बांधव दाखल झाले आहेत..

मराठा आंदोलकांची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये म्हणून बारामती मधील मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आंदोलकांसाठी बारामतीतून ५००० हजार भाकरी १००० हजार बिसलेरी बॉक्स, बिस्कीट पुडे आणि इतर साहित्य रवाना करण्यात आले आहे… जोपर्यंत मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू राहील तोपर्यंत बारामतीमधून मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्यात येईल असा देखील विश्वास यावेळी मराठा बांधवांनी व्यक्त केलाय…..

Related Articles

Back to top button