तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सव उपक्रम साजरा
विद्यार्थ्यांनी एक पुस्तक वाचून त्याचा फोटो दिलेल्या लिंकवर अपलोड

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सव उपक्रम साजरा
विद्यार्थ्यांनी एक पुस्तक वाचून त्याचा फोटो दिलेल्या लिंकवर अपलोड
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पुणे पुस्तक वाचन उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी कथा, कादंब-या, चरित्रे, अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तके यांचे वाचन करून सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उदघाटन मा.प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.अशोक काळंगे, प्रा.डॉ.योगिनी मुळे, प्रा.डॉ.सचिन गाडेकर, शास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.विकास काकडे, कला शाखेच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.सीमा नाईक गोसावी, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ.निरंजन शहा, ग्रंथपाल डॉ.अमर कुलकर्णी उपस्थित होते.
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय पुस्तक न्यास, नवी दिल्ली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पुस्तक महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी एक पुस्तक वाचून त्याचा फोटो दिलेल्या लिंकवर अपलोड केले.
उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अमर कुलकर्णी यांनी मा.प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे मार्गदर्शनाखाली केले. वाचन संस्कृती वाढविण्याचे आवाहन अधिष्ठाता व मराठी विभाग प्रमुख डॉ.सीमा नाईक गोसावी यांनी यावेळी केले.