मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे रिपोर्ट संध्याकाळी आले. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डाँक्टर रिपोर्ट तपासतील आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. वरिष्ठ डॉक्टरांचा मुख्यमंत्र्यांना एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय ठाकरे कुटुबीयांशी चर्चा करून घेण्यात आली. तसंच मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात HN रिलायंन्स हाँस्पिटल कोणतीही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहीती मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram