क्राईम रिपोर्ट

मुरूम येथील खुनाच्या प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस धुळे येथून केली अटक

जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले होते

मुरूम येथील खुनाच्या प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस धुळे येथून केली अटक

जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले होते

क्राईम;बारामती वार्तापत्र

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दि 24/4/2022 रोजी मुरूम गावचे हद्दीत ता बारामती जि पुणे येथे आरोपी वैभव दिपक खरात याने फिर्यादीचा मुलगा आदित्य युवराज सोनवणे याला वैभव दिपक खरात, यांने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले होते, सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडलेपासून फरार झाला होता सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा धुळे येथे असल्याचे गोपनीय माहिती मिळताच धुळे येथे जाऊन वैभव दिपक खरात रा मुरूम ता बारामती याला धुळे येथून ताब्यात घेऊन अटक केले व मा. बारामती न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे,.

सदरची कामगिरी ही मा. डॉ पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख सो, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते सो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे, वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी मा सोमनाथ लांडे, यांचे मार्गदर्शनाखाली ASI महेश पन्हाळे, पोहवा राहुल भाग्यवंत, पोना अमोल भोसले, पोना भाऊसाहेब मारकड, पो शि पोपट नाले यांनी केली

Back to top button