मुलांनो अभ्यासाला लागा..दहावी बारावीच्या परीक्षांबाबत पाहा कोर्टानं काय दिलाय निर्णय
10वी आणि 12वीच्या ऑनलाईन परीक्षेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.
मुलांनो अभ्यासाला लागा..दहावी बारावीच्या परीक्षांबाबत पाहा कोर्टानं काय दिलाय निर्णय
10वी आणि 12वीच्या ऑनलाईन परीक्षेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.
मुंबई : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने CBSE, ICSE आणि राज्य मंडळाच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. ऑफलाईन परीक्षे संदर्भात आता एक महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण चित्रच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ऑनलाइन कराव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांत झाली. मात्र या सगळ्यावर आता सुप्रीम कोर्टानं अंतिम निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार दहावी बारावी परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाईनच होणार आहे.
सुप्रीम कोर्टात ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. दहवी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय
सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस तसेच सर्व राज्यांच्या बोर्डांनी दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठीची तयारी केली आहे. या टप्प्यावरून परीक्षा सुरळीत होण्यासाठी संबंधित प्रशासनाला त्यांचे काम करू देणे हे श्रेयस्कर आहे. जर कोणाला परीक्षेच्या तारखांवरून अथवा परीक्षेच्या आयोजनावरून काही तक्रार असेल तर संबंधित प्रशासनाला लेखी स्वरुपात कळविता यईल.
विशेष परिस्थितीत अपवाद म्हणून परीक्षा ऑनलाईन घेतली जाऊ शकते. पण कायम ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्या ही मागणी करणे तसेच या मागणीला मंजुरी देणे योग्य ठरणार नाही. सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस तसेच सर्व राज्यांच्या बोर्डांच्या दहावी बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धत ही आदर्श पद्धत नाही. त्यामुळे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.