मुलीच्या लग्नासाठी साड्या घेण्यासाठी आलेल्या महिलांचा ९० हजारांच्या पैठण्यांवर डल्ला, सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
वसईतल्या एका साडीच्या दुकानात
मुलीच्या लग्नासाठी साड्या घेण्यासाठी आलेल्या महिलांचा ९० हजारांच्या पैठण्यांवर डल्ला, सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
क्राईम;बारामती वार्तापत्र
मुंबईत एका चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वसईतल्या एका साडीच्या दुकानात दोन महिलांनी केलेली ही संपूर्ण चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलांनी जवळपास 90 हजारांच्या साड्यांची चोरी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी 27 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वसईतील स्टेला संकुलातील सद्गुरूज हातमाग साडीच्या दुकानात दोन महिला आपल्या मुलीच्या लग्नासाठी साड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.साडी निवडताना एक महिला साडी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष वेधून घेते, तर दुसरी महिला दुकानदाराने दाखवलेली साडी तिच्या साडीत लपवते. दोन चोरट्यांनी दुकानदाराच्या नऊ सिल्क पैठणी साड्या दोन-तीन वेळा चोरल्या आणि साड्या न घेता परतले. या दोघी महिलांनी दुकानात उपस्थित दुकानमालक चेतन भट्ट यांना गंडवून साड्यांवर डल्ला मारला. पण दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आहे.
दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही महिलांची प्रत्येक हालचाल कैद झाली आहे. दुकान मालक चेतन भट्ट यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.