मुस्लीम समाजाने मिळालेल्या निधीचा योग्य वापर करावा – खा.सुनेत्रा पवार
बारामती तालुक्यात 221 व्यावसायिकांना प्रत्येकी 3 लाख याप्रमाणे 6 कोटी 63 लाख वाटप

मुस्लीम समाजाने मिळालेल्या निधीचा योग्य वापर करावा – खा.सुनेत्रा पवार
बारामती तालुक्यात 221 व्यावसायिकांना प्रत्येकी 3 लाख याप्रमाणे 6 कोटी 63 लाख वाटप
बारामतीा वार्तापत्र
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे मुस्लीम समाजाला मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून आपआपले व्यवसायात उन्नती करावी असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.
बारामतीत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे धनादेश वाटप कार्यक्रमात खा.पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन मुशताक अंतुले, संचालक सलिम सारंग, कार्यकारी संचालक गफार मगदुम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अविनाश बांदल, बारामती बँकेचे संचालक ॲड.शिरीष कुलकर्णी, दिलीप ढवाण, नितीन शेंडे, तैनुर शेख, महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, माजी नगरसेविका सौ.अनिता जगताप, सौ.सविता जाधव, सौ.यास्मीन बागवान इ.मान्यवर उपस्थित होते.
पुढे खा.पवार म्हणाल्या की, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्याने बारामतीतील छोट्या व्यवसायिकांना 3 लाखाची रक्कम मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे.
या रक्कमेचा योग्यरीत्या वापर करून त्याची मुदतीत परतफेड करावी असेही त्या म्हणाल्या. दिलेला शब्द पाळणारे अजितदादा आहेत हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आलताफ सय्यद व त्यांच्या एकता ग्रुपचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी मुशताक अंतुले यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पुणे जिल्ह्यातून जेवढे प्रस्ताव महामंडळाकडे येतात तेवढे इतर जिल्ह्यातून येत नाही. अशाच प्रकारे नविन योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी 221 व्यावसायिकांच्या वतीने आलताफ सय्यद यांचा सत्कार खा.सुनेत्रावहिनींच्या हस्ते घेण्यात आला.
या योजनेसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार खा.सुनेत्रावहिनींच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आलताफ सय्यद यांनी केले. सुत्रसंचालन हाजी कमरूद्दीन सय्यद यांनी केले तर शेवटी आभार सुभान कुरैशी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य मुस्लीम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.