मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यशाळा उत्साहात संपन्न
“भारतीय संविधान समजून घेताना”

मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यशाळा उत्साहात संपन्न
“भारतीय संविधान समजून घेताना”
सोमेश्वरनगर :प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (युनिट क्र. बी-०२१) विभागाच्या वतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी “भारतीय संविधान समजून घेताना” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. पोपट शिंदे यांनी संविधानाचा ऐतिहासिक आढावा घेतला. आपल्या प्रभावी व्याख्यानात त्यांनी सांगितले की, “७५ वर्षांपूर्वी जुनी राज्यव्यवस्था मागे पडून नवी लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. १९४६ मध्ये मसुदा समितीची स्थापना झाली. संविधानामुळे भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, मूळ राज्यघटनेत ३९५ कलमे, २२ प्रकरणे आणि ८ परिशिष्टे असून संविधानातील सर्व तत्त्वे एकमताने स्वीकारली गेली आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “भारत हा विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि विचारधारांनी समृद्ध देश आहे. तरीसुद्धा या विविधतेत एकतेचे सुंदर दर्शन घडते, हेच आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य आहे.”
या प्रसंगी डॉ. प्रवीण ताटे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजू जाधव, डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. रविकिरण मोरे, प्रा. रजनीकांत गायकवाड, प्रा. पोपट जाधव, डॉ. कल्याणी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी, जिल्ह्यातील शिक्षकवर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे (कार्यक्रम अधिकारी, रा.से.यो.) यांनी केले. अतिथींचा परिचय उपप्राचार्या डॉ. जया कदम यांनी करून दिला, तर डॉ. नारायण राजूरवार यांनी आभार प्रदर्शन केले.