इंदापूर
मेघगर्जनेसह इंदापूरात कोसळल्या पावसाच्या सरी
उकाड्याने हैराण झालेल्या इंदापूरकरांना पावसामुळे दिलासा

मेघगर्जनेसह इंदापूरात कोसळल्या पावसाच्या सरी
उकाड्याने हैराण झालेल्या इंदापूरकरांना पावसामुळे दिलासा
इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस बुधवारी ( दि.७ ) दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार बरसला.आकाशाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह उकाड्याने हैराण झालेल्या इंदापूरकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला.
दिवसभर प्रखर उन्हानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे सर्वांचीच धावाधाव झाली.जोरदार झालेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र होते.अचानकपणे पावसाने जोर पकडल्याने दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणातील गारव्याने सुखद दिलासा मिळाला.मात्र बऱ्याच दिवस दडी मारलेल्या पावसाने जोर धरल्याने जनावरांचा चारा व इतर शेतातील कांदा पिकांना झळ पोहचली आहे.