मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारविरोधात मोठा गंभीर आरोप
गोव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे.
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारविरोधात मोठा गंभीर आरोप
गोव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे.
प्रतिनिधी
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारविरोधात मोठा गंभीर आरोप केला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. कोव्हिड काळात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला, असा गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घालावं, अशी मागणी सत्यपाल मलिक यांनी केली आहे. आज तकला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी गोवा सरकारविरोधात मोठा आरोप केल. सत्यपाल मलिक याअगोदर गोव्याचे राज्यपालही राहिले आहेत.
मोदीजी लक्ष घाला
‘गोवा सरकारची घरोघरी रेशन वाटपाची योजना अव्यवहार्य होती. सरकारला पैसे देणाऱ्या कंपनीच्या सांगण्यावरून हे केले गेले. माझ्याकडे काँग्रेससह इतर पक्षांनी चौकशीशी मागणी केली होती. मी या प्रकरणाची चौकशी करून पंतप्रधानांना माहिती दिली, असंही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.
मी लोहियावादी, भ्रष्टाचार सहन करू शकत नाही
सत्यपाल मलिक म्हणाले, “गोव्यातील भाजप सरकार कोव्हिड परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकले नाही. मी हे खूप विचारपूर्वक बोलतोय आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला. गोवा सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मला गोव्याच्या राज्यपालपदावरुन हटविण्यात आलं हकालपट्टी झाली. मी लोहियावादी आहे, चरणसिंग यांच्यासोबत मी काम केलं आहे, मी भ्रष्टाचार सहन करू शकत नाही.”
मी खरं बोलायला घाबरत नाही
सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, मला जे वाटते तेच मी बोलतो, मी कुणाला घाबरत नाही. सरकारला सध्याची राज्यपालांची इमारत पाडून नवीन इमारत बांधायची होती, पण त्याची गरज नव्हती. सरकारवर आर्थिक दबाव असताना हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.