महाराष्ट्र

मेट्रो, ग्रंथालयाला परवानगी; राज्यात उद्यापासून काय सुरु, काय बंद?

राज्यात आता लॉकडाऊन संपून अनलॉकचा टप्पा सुरू झाला आहे. यापूर्वी सरकारने अनलॉकसंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर आज पुन्ही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

मेट्रो, ग्रंथालयाला परवानगी; राज्यात उद्यापासून काय सुरु, काय बंद?

राज्यात आता लॉकडाऊन संपून अनलॉकचा टप्पा सुरू झाला आहे. यापूर्वी सरकारने अनलॉकसंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर आज पुन्ही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आज राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर करून अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यास परवागनी दिली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू असतानाच सरकारने मेट्रोसेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

१५ ऑक्टोबरपासून राज्य सरकारने मेट्रो सेवा टप्प्याटप्यानं सुरु करण्यास परवागनी दिली आहे. त्यासाठी नगरविकास विभागानं जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ग्रंथालये, आठवडी बाजारही सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबरोबरच, उद्यापासून कोणत्या सेवा सुरू होणार व कोणत्या सेवा तूर्तास बंदचं राहणार आहेत जाणून घ्या.

या सेवा सुरू राहणार

ग्रंथालय, गार्डन, उद्याने उद्यापासून सुरू होणार

व्यावसायिक प्रदर्शने भरवण्यास परवानगी

कंटेन्मेंट झोनवगळता इतर ठिकाणी स्थानिक आठवडी बाजार, गुरांचा बाजार उघडण्यास परवानगी

ऑनलाइन शिक्षणाला परवानगी

केंद्रानं परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार

दुकानं सकाळी ९ ते रात्री ९पर्यंत सुरू राहू शकतात

शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी

या सेवा बंदच राहणार

धार्मिक स्थळे, मंदिरे तूर्तास बंदच राहणार

शाळा, महाविद्यालये ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार

सिनेमा हॉल, थिएटर ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच

लग्न समारंभासाठी यापूर्वी घातलेल्या अटी कायम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram