मेडिकोज् गिल्ड बारामती’च्या अध्यक्षपदी डॉ. गोकुळ काळे यांनी निवड
'डिजिटल डिटॉक्स' ही संकल्पना तज्ज्ञांच्या कार्यशाळेतून राबविणार आहे."

मेडिकोज् गिल्ड बारामती’च्या अध्यक्षपदी डॉ. गोकुळ काळे यांनी निवड
‘डिजिटल डिटॉक्स’ ही संकल्पना तज्ज्ञांच्या कार्यशाळेतून राबविणार आहे.”
बारामती वार्तापत्र
शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या ‘मेडिकोज् गिल्ड बारामती’च्या अध्यक्षपदी डॉ. गोकुळ काळे यांची, तर सचिवपदी डॉ. सुनील पवार यांची सन २०२६-२७ या वर्षासाठी निवड करण्यात आली.
यावेळी बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव व माजी नगराध्यक्षा जयश्री सातव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला. मावळते अध्यक्ष प्रदीप खलाटे यांनी सरत्या वर्षाचा आढावा सादर केला.
यावेळी डॉ. काळे म्हणाले, “अजितदादांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी यावर्षी ‘गो ग्रीन’ संकल्पना राबवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जाईल. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सामाजिक व कौटुंबिक समस्या वाढत आहेत, यावर उपाय म्हणून बारामतीकरांसाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ ही संकल्पना तज्ज्ञांच्या कार्यशाळेतून राबविणार आहे.”
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – गोकुळ काळे, उपाध्यक्ष-प्रशांत मांडण, अंजली खाडे, सचिव सुनील पवार, सहसचिव- सोनिया शाह, खजिनदार – संदीप शाह, सह खजिनदार केतकी नाळे, वित्त सचिव सुजित अडसूळ, शैक्षणिक समिती सौरभ मुथा, सिद्धार्थ वाबळे, अपूर्वा देशपांडे,श्रुती गायकवाड, गीतांजली अंबर्डेकर. क्रीडा समिती – प्रीतम ललगुणकर, राधेय खलाटे, हनुमंत गोरड, नितीन काळे, सुनीत कोठारी, हेमा बर्गे, मनीषा शेळके, वृषाली हरके, नंदिता देवकाते. सहल समिती- आनंद गवसणे, सुयश शाह, हर्षल राठी, दीपा भंडारे, नीती महाडीक, प्राची गोरड. सांस्कृतिक व साहित्यिक समिती- चंद्रकांत पिल्ले, वैभव काटे, चंद्रशेखर धुमाळ, तुषार गदादे, कृष्णांजली खलाटे, मीनल गवसणे, स्मिता बोके, शीतल मेहता, निकिता मेहता, रेश्मा ओसवाल. वाचनालय समिती- श्रीरंग सोळुंके, संतोष घालमे, स्वाती वणवे, पद्मश्री पवार. पर्यावरण समिती- सुहासिनी सातव, वर्षा सिधये, सतीश वडगांवकर, वृषाली हरके,राजेश कोकरे. डिटॉक्स समिती- श्रीरंग सोळुंके, प्रशांत जळक, संताजी शेळके, अपर्णा घालमे. महिला समिती – निर्मला भोईटे, सुहासिनी सोनवले, श्वेता राणे- चव्हाण, नेत्रा सिकची, अपर्णा राठी, शरयू धुरगुडे, माधुरी राऊत, वृषाली काळे, अनुराधा लोंढे, रंजना तांबे, सुनीता शाह, संगीता दोषी, भारती मुथा, नयन गांधी, मीनाक्षी देवकाते. प्रसारमाध्यम समिती – राहुल संत, राकेश मेहता, सौरभ दोषी (ढाकाळकर). कायदेशीर सल्लागार प्रीतम व्होरा. स्थायी समिती- राजेंद्र चोपडे, राजीव शाह, रमेश भोईटे. कार्यकारी समिती-दिनेश ओसवाल, मोहन पाटील, एम. आर. दोषी, बापू भोई, महेश जगताप, आशुतोष आटोळे, एन. एन. देवकाते.






