स्थानिक

मॉर्फा च्या वतीने बांधावरील प्रयोग शाळा संपन्न

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मातोश्री श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांची उपस्थिती

मॉर्फा च्या वतीने बांधावरील प्रयोग शाळा संपन्न

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मातोश्री श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांची उपस्थिती

बारामती वार्तापत्र

ऊस शेतीबाबत फसवणूक पासून शेतकऱ्यांनी सावध राहून अत्याधुनिक शेतीतंत्र ज्ञान यांचा फायदा व पाडेगाव संशोधन केंद्राचे अचूक मार्गदर्शन घेऊन उत्कृष्ट शेती होऊ शकते असे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह फार्मर जळोची व पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र यांच्या वतीने ‘ऊस पीक परिसंवाद लक्ष एकरी शंभर टन उसाचे ‘या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उदघाटन प्रसंगी राजेंद्र पवार मार्गदर्शन करीत होते.

या प्रसंगी पाडेगाव संशोधन केंद्राचे डॉ भरत रासकर, डॉ, सुरेश उबाळे, डॉ सुभाष घोडके, व बीएएसएफ कंपनीचे सुदर्शन कदम, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल व आयोजक ऍड जगन्नाथ हिंगणे, प्रताप पागळे, दीपक मलगुंडे, बापूराव जमदाडे व श्रीरंग जमदाडे, धनंजय जमदाडे, विष्णू हिंगणे, शेखर सातकर आदित्य हिंगणे, ऍड अमोल सातकर, महादेव चौधर,तानाजी करचे आदी मान्यवर उपस्तित होते ऊस शेती करताना ड्रीप चा वापर करा असेही पवार यांनी सांगितले.

उसाचे नवीन वाण, अन्नदव्य नर्सरी व्यवस्थापन, ऊस तणनाशक, लक्ष एकरी शंभर टणाचे आदी विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले
परिसरातील शेती संपून नागरिकीकरण वाढत असताना या पुढे स्थानिक शेतकऱ्यांनी शेती विकू नये व उत्कृष्ट शेती करावी या साठी मार्गदर्शन आयोजित केल्याचे प्रास्तविक मध्ये ऍड जगन्नाथ हिंगणे यांनी सांगितले.

प्लॉटिंग साठी शेती विकून इतर तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांनी शेती घेतल्याने त्यांना या परिसंवाद चा लाभ होईल असे सांगून, आभार प्रदर्शन प्रताप पागळे यांनी आभार व्यक्त केले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram