मोटार चोरी कशी पकडली वाचा सविस्तर.
बारामती तालुका पोलीस स्टेशन ची कामगिरी.
बारामती:वार्ताहर बारामती तालुका पोलिस स्टेशनचे धडक कामगिरी मोटार चोरी करणारी टोळी गजाआड करोना वायरच्या महामारी मुळे तसेच शेतीमालाला भाव नसल्याकारणाने शेतकरी हतबल झाला असताना बारामती मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते या कारणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मध्ये आणखी भर पडली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना भेटून शेतकऱ्यांनी मोटरी चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घ्यावा अशी विनंती केली होती त्याप्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास प्रमुख सपोनि योगेश लंगोटे पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यानंतर डीबी पथकाने अथक परिश्रम करून गोपनीय माहिती दाराच्या मार्फत माहिती काढून मोटर चोरीतील आरोपी नामे 1)नीलेश माकर 2)सागर चव्हाण 3)दत्ता माकर वरील सर्व राहणार उंडवडी कप तालुका बारामती जिल्हा पुणे 4)विक्रम उर्फ भैया चव्हाण राहणार अंजनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे अटक करून इन पानबुडी मोटर त्यांच्याकडून हस्तगत केलेले आहेत यामुळे बारामती परिसरातील शेतकरी सुखावलेला आहे आणि सर्व शेतकरी वर्गाकडून बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.