मोठं विधान;किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ,राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया”
या मुद्यावरून आता शिवसेना आणि भाजपचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
मोठं विधान;किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ,राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया”
या मुद्यावरून आता शिवसेना आणि भाजपचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नव्या ट्विटने आता खळबळ उडवून दिली आहे. रिसॉर्ट बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये कुठून आले, असा सवाल नंतर आता थेट ट्विट करून अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया, चला दापोली, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांच्या ट्विटनंतर, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
किरीट सोमय्या यांनी म्हटले, लोकायुक्त यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे मान्य केले. या रिसोर्टच्या बांधकामाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही सरकारने कारवाई केली आहे. मात्र, रिसॉर्टवरील कारवाईबाबत हालचाली दिसत नाही. गरिबाने अनधिकृत बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई होते, मग, अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट का कारवाई होत नाही असा सवालही त्यांनी केला. 26 मार्च रोजी सकाळी आम्ही दुपारी 3 वाजता दापोली येथे जाणार असून रिसॉर्ट तोडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या पैशातून परब यांनी या रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आमची कृती ही जनआंदोलन असून सत्याग्रह आहे. त्यामुळे कायदा हातात घेणार नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट तोडून अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याकडून देण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर सतत त्याचा पाठपुरावा केला होता.
नेमकं काय आहे किरीट सोमय्यांचं ट्विट?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी लिहिलं, “26 मार्च – चला दापोली…. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”. अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. त्यानंतर आता तारीख जाहीर करुन रिसॉर्ट तोडण्याबाबत ट्विट केलं आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.