इंदापूर

मोठा धक्का; इंदापुरात राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्षांच्या विरोधाला डावलून भरत शहांना अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

मोठा धक्का; इंदापुरात राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्षांच्या विरोधाला डावलून भरत शहांना अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रतिनिधी; इंदापूर

इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भरत शहा यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुदत संपण्याच्या आत भरत शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांसह इतर नेते मंडळींच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करीत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यावरती शिक्कामोर्तब झाले असून भरत शहा यांना इंदापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष गारटकर यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. असं असताना ही पक्षाने जिल्हाध्यक्ष गारटकर विरोधी भूमिका घेत भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कायम केली आहे.आज भरत शहा यांनी इंदापूर नगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यासह इंदापूरच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,माजी नगरसेवक गजानन गवळी,स्वप्नील राऊत, बापूराव जामदार, संजय दोशी, शहा कुटुंबातील प्रमुख मुकुंद शहा, अंगद शहा, वैशाली शहा यांसह इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहा यांनी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.

Back to top button