स्थानिक

बारामती मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

५२७ जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली

बारामती मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

५२७ जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली

बारामती वार्तापत्र

सोमवार 26 जुलै रोजी २२ वा कारगिल विजय दिवस जय जवान आजी-माजी सैनिक संघटना बारामती यांच्या वतीने भिगवण चौकात शहीद स्मारकाला पुष्प हार अर्पण करून व कारगिल युद्धात शहीद झालेल्या ५२७ जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव निंबाळकर , सचिव श्री राहुल भोईटे , जेष्ठ माजी सैनिक सोपानं बर्गे , संघटनेचे कार्याध्यक्ष भारत जाधव , सदस्य कॅप्टन लडकत , कॅप्टन तावरे , नगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे प्रमुख महेश तोडकर भूमि अभिलेख चे मंगेश चव्हाण , विलास कांबळे, शिवनिंगा माळी वीर पत्नी मोरे आणि मोठ्या संख्येने संघटनेतील सदस्य उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे , अध्यक्ष निंबाळकर , सचिव राहुल भोईटे , सोपान बर्गे व राजेंद्र चव्हाण साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Back to top button