मुंबई

मोठा निर्णय; कोरोना काळातील सर्व गुन्हे मागे घेणार, गृहमंत्री दिलीप वळसे

सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने तत्त्वत: घेतला

मोठा निर्णय; कोरोना काळातील सर्व गुन्हे मागे घेणार, गृहमंत्री दिलीप वळसे

सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने तत्त्वत: घेतला

मुंबई – प्रतिनिधी

मागील २ वर्षापासून संपुर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. यामुळे सगळीकडे कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले होते, देशात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात होती. यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर होते.

लॉकडाऊन काळात नागरिकांनी बाहेर पडून कोरोना वाढवू नये, यासाठी प्रशासनाने अनेक नियमावल्या जाहीर केल्या होत्या.त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात गुन्हे दाखल झालेल्या काही नागरिकांना मोठ्या दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, नागरिकांवर लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल IPC 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व खटले राज्य गृह विभागाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

१८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार – “कोविडच्या काळात ज्या नागरिक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या त्यांना विविध अडचणी येत आहेत. त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात या विषयावर निर्णय घेण्यात येईल” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा – बैलगाडा शर्यतीला बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय वळसे -पाटील यांनी सोमवारी जाहीर केला होता. आज कोविड काळात विद्यार्थी, नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram