राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.
मुंबई : प्रतिनिधी
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चार दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात काही ठिकाणी आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हिमालयाच्या पायथ्याशी झालेल्या हवामान बदलामुळे राज्यात पुढील 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन दिवस पाऊ झाल्यानंतर पुढील पाच दिवस मात्र 29 एप्रिल ते 2 मेपर्यंत उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागात 27 आणि 28 एप्रिलला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागील पंधरवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने आंबा हंगामावर परीणाम झाला आहे. सध्या आलेला मोहोर ५ टक्के गळून गेला असून, उरलेला मोहोर वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरु आहे. फवारणीचा खर्च वाढतोयं अशी सध्या कोकणातील परीस्थिती आहे. आता परत पाऊस झाला तर बागायतदारांना फवारणीचा खर्च वाढवायला लागेल.
सध्या ऊस तोड हंगाम जोरात सुरु आहे. पावसाच्या भितीने उसाची तोड लगबगीने करण्याची शिवारात धांदल उडाली आहे. रब्बी ज्वारीसाठी पावसाची आवश्यकता असली तरी त्याची हुलकावणी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नव्या उसाची लागणही सुरु झाली आहे.
जळगाव, नाशिक, नगर या भागांत उष्णतेची लाट तीव्र राहणार आहे. आगामी पाच दिवसांत 29 एप्रिल ते 2 मेदरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार आहे असंही हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या 24 तासांत कोकणात जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान होतं.