मोठी कारवाई ; वालचंदनगर पोलिसांनी पकडला धारदार शस्त्र साठा
पार्सलची पाहणी केली असता त्यामध्ये 10 धारदार शस्त्रे मिळुन आली

मोठी कारवाई ; वालचंदनगर पोलिसांनी पकडला धारदार शस्त्र साठा
पार्सलची पाहणी केली असता त्यामध्ये 10 धारदार शस्त्रे मिळुन आली
बारामती वार्तापत्र
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वालचंदनगर येथुन दहा घातक हत्यारे मोटारसायकलवरुन घेवुन निघाला असल्याची बातमी वालचंदनगर पोलीस स्टेशन के प्रभारी अधिकारी श्री दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक यांना मिळाली त्यांनी सदरची मिळालेल्या माहितीप्रमाणे वालचंदनगर रोडवर एक संशयित दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवर काहीतरी पार्सल घेवुन येत असल्याचे दिसल्याने त्यास थांबवून त्याचेकडील पार्सलची पाहणी केली असता त्यामध्ये 10 धारदार शस्त्रे मिळुन आली आहेत सदर इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन गंधारे रा. शेळगाव ता. इंदापुर हा असुन सदर अरोपीस बुचाकीसह ताब्यात घेवुन त्याला अटक केली असुन त्यावर वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये शस्त्र अधिनियम या कायद्यान्येय गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कामगिरी सदरची कामगिरी मा. डॉ. श्री अभिनव देशमुख सो. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री मिलीद मोहिते लो. अपर पोलीस अधिक्षक आरामती पुणे ग्रामीण, मा. श्री नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली श्री.दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक,महिला पोलीस मोनिका मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पो.हवा. माने 833, पो. ना. वायसे 2235, पो.कॉ. चितकोटे यांनी पार पाडली.