मुंबई

मोठी बातमी,राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल,सिनेमागृहे,रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु

4 मार्चपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिकस्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

मोठी बातमी,राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल,सिनेमागृहे,रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु

4 मार्चपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिकस्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

प्रतिनिधी

मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्याने आता केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सर्व व्यव्हार पुन्हा सुरळीतपणे सुरु व्हावेत या उद्देशाने सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून  नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिकस्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर इतर जिल्ह्यांमध्ये हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. राज्य सरकारच्या या नव्या गाईडलाईन्सनुसार राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची वाटचाल पूर्णपुणे लॉकडाऊनमुक्तीकडे असल्याचं दृश्य आहे.

‘या’ 14 जिल्ह्यात 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स

  • मुंबई शहर
  • मुंबई उपनगर
  • पुणे
  • भंडारा
  • सिंधुदुर्ग
  • नागपूर
  • रायगड
  • वर्धा
  • रत्नागिरी
  • सातारा
  • सांगली
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • कोल्हापूर

काय आहे नवे नियम?

  • राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालये  100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी
  • शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
  • रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक
  • चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना  लसीचे दोन डोस बंधनकारक
  • मनोरंजन व उद्याने जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी
  • लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले आहेत.

14 जिल्हे अनलॉक करण्याचे निकष 

  •  पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90  टक्क्यांपेक्षा अधिक
  • दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा  अधिक
  • पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यापेक्षा कमी हवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram