पुणे

मोठी बातमी; कोणतेही पुरावे न आढळल्यामुळे कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले

या दंगलीमध्ये भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती.

मोठी बातमी; कोणतेही पुरावे न आढळल्यामुळे कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले

या दंगलीमध्ये भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती.

पुणे: प्रतिनिधी

कोरेगाव भीमा प्रकरणात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांना गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करून संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्यामुळे त्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे..

या दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर वर्षभर पूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगा समोर असलेल्या सुनावणीदरम्यान दिले आहेत.

ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचं लेखी अहवाल दिला आहे.

उर्वरीत 41 निष्पन्न आरोपींविरोधात न्यायालयात 22 सप्टेंबर 2011 रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपास यंत्रणेतून वरील गुन्ह्यात तपासादरम्यान संभाजी भिडे यांच्याकडून मानवी हक्काचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाले नाही असा अहवाल शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram