मोठी बातमी ; गोकुळची दूध दरवाढ, असे असतील नवे दर
14 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून अंमलात आले आहेत
मोठी बातमी ; गोकुळची दूध दरवाढ, असे असतील नवे दर
14 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून अंमलात आले आहेत
प्रतिनिधी
गोकुळच्या दूध दरासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. गोकुळनं आज आपल्या दूध विक्री किंमतीत 2 रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे ‘गोकुळ’च्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किंमत ही 48 रुपये लीटर अशी राहणार असल्याचं संघाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे. हे दर आजपासून अंमलात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळनं दूध विक्री किंमतीत 2 रुपयांची वाढ केली. ही दर 14 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून अंमलात आले आहेत. हे नवे दर मुंबई शहर आणि उपनगर, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात लागू करण्यात आलेत.
गोकुळ दूधाचे नवे दर खालीलप्रमाणे
याचवर्षी जुलै महिन्यात गोकुळ दुधाच्या खरेदी-विक्रीच्या किंमतीत वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर नवे दर 11 जुलै पासून लागू करण्यात आले. जुलै महिन्यातही गोकुळ दूध उत्पादकांकडून म्हशीच्या दूध खरेदीच्या किंमतीत 2 रुपये तर गायीच्या दूध दरात 1 रुपयांनी वाढ केल्याचा निर्णय घेतला होता.