मोठी बातमी : बारामती उद्या मध्यरात्रीपासून सात दिवसांसाठी लॉक! औषध दुकाने व हॉस्पिटल वगळताा कोणीही येणार नाही कोणी जाणार नाही!
हॉस्पिटल, औषध विक्री दुकाने वगळून सर्व बंददूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंतच सूरू राहील
मोठी बातमी : बारामती उद्या मध्यरात्रीपासून सात दिवसांसाठी लॉक! औषध दुकाने व हॉस्पिटल वगळताा कोणीही येणार नाही कोणी जाणार नाही!
हॉस्पिटल, औषध विक्री दुकाने वगळून सर्व बंददूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंतच सूरू राहील
बारामती वार्तापत्र
बारामतीत येत्या बुधवारपासून (परवा, 5 मे 2021) सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.
उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनाबाबत सर्व यंत्रणाशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी आणखी कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे.
काय आहे नियमावली?
बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना/दुकाने पुढील 7 दिवस बंद राहतील. फक्त दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील, असे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले. औद्योगिक वसाहती मधील ज्या कंपन्या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात त्या सुरु राहतील. ज्या कंपन्यांनी कर्मचा-यांची राहण्याची सोय कंपनीच्या कार्यक्षेत्रात केली आहे त्याही कंपन्या सुरू राहतील. इतर कंपन्या शासनाने पारित केलेल्या नियमाप्रमाणे चालू राहतील. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
अजित पवारांकडून आढावा
गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक घेत बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अजित पवारांनी जाणून घेतली होती. अजित पवार यांनी बारामतीतल्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वीकेंडला लॉकडाऊनला प्रतिसाद
राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुकारलेल्या वीकेंडला लॉकडाऊनला बारामतीत 100 टक्के प्रतिसाद मिळाला होता. मेडिकल आणि दूध विक्री वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. बारामतीत प्रत्येक चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने पोलिसांकडून चौकशी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. इतकंच नाही, तर बारामतीत विनाकारण मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींची ॲंटीजेन तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
या बैठकीतील चर्चेत बारामती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील भाग घेतला. यादरम्यान वेगळ्या सूचना मांडण्यात आल्या. बारामतीतील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी सर्वांचे एकमत आहे, मात्र काही दुकाने चालू आणि काही दुकाने बंद अशी भूमिका नको अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
बारामतीमध्ये केवळ या एप्रिल महिन्यात गेल्या संपूर्ण वर्षभरात जेवढे रुग्ण आढळले, तेवढे रुग्ण एका महिन्यात आढळले आहेत. या एकाच महिन्यात नऊ हजार रुग्ण आढळल्याने ही चिंता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येचा हा विस्फोट लक्षात घेता बारामतीमध्ये कठोर लॉकडाऊनची गरज होती.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी पद्यश्री दाईगडे, सिल्वर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरिक्षक बारामती शहर नामदेव शिंदे, पोलीस निरिक्षक ग्रामीण एम. के. ढवाण, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सभाजी होळकर, भाजपा चे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, व्यापारी असोसिएनचे नरेंद्र गुजराथी, विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते, म.न.से. चे अध्यक्ष ॲड. सुनिल पाटसकर, नगरसेवक संजय संधवी, एम.आय.डी.सी. चे अध्यक्ष धनंजय जामदार, कॉग्रेसचे ॲङ गालिंदे, शिवसेनेचे ॲङ राजेंद्र काळे, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष प्रविण अहुजा, लॉजिंग संगटणेचे अध्यक्ष शैलेश साळुंके, भाजपचे शहर अध्यक्ष सतिश फाळके, रासपचे श्हर अध्यक्ष ॲड. अमोल सातकर, बारामती शहरातील व्यापारी, औद्योगिक वसाहतीमधील प्रतिनिधी व डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
सर्व आस्थापनाचे मालक, चालक आणि सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग या त्रिसूत्रीचे व शासनाच्या सूचनांचे पालन करावे, नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये असे, आवाहनही यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.