मोठी बातमी; बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर वेळापत्रकात बदल,नेमकं कारण काय?
5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
मोठी बातमी; बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर वेळापत्रकात बदल,नेमकं कारण काय?
5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
मुंबई; प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
5 आणि 7 मार्चला भाषा विषयाचे पेपर होणार होते, पण ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 5 आणि 7 एप्रिलला आता या विषयांचे पेपर घेतले जाणार आहेत.
5 मार्चला प्रामुख्याने हिंदी, जर्मन, जपानी, चीनी आणि पर्शियन या भाषा विषयांचे पेपर होणार होते, ते पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत.
तर 7 मार्चला मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, मल्याळम, तेलगु, पंजाबी, उर्दु, फ्रेंच अशा विषयांचे पेपर होणार होते, पण हे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहे.
काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे. येत्या चार मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे.
महाराष्ट्रातील बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा कधी?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.
दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा
दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.